
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) च्या क्रिकेट सल्लागार समितीचा (सीएसी) राजीनामा दिला आहे. कपिल देव या समितीचे प्रमुख होते. कपिल देव यांनी ईमेलद्वारे आपल्या राजीनाम्याचा निर्णय बोर्डाला कळवला. दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी त्यांना नोटीस पाठवली होती.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिलदेव हे क्रिकेट सल्लागार समितीच्या अध्यक्षपदासह समालोचक, एका फ्लडलाइट्स कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी देव यांना दुहेरी हितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली होती.











