
मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 3 रुग्ण (COVID-19 Death Cases in Mumbai) दगावल्याची माहिती मिळत आहे. हा मृत्यूदर आतापर्यंतचा सर्वात कमी मृत्यूदर आहे.
हे दिलासादायक स्थिती पाहून मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सर्व कोविड योद्धांचे आणि जनतेचे आभार मानले आहेत. महाराष्ट्र सरकार व बीएमसीच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. सहकार्य आणि सहकार्याबद्दल मी मुंबईकरांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले आहेत.
सर्व डॉक्टर आणि आघाडीच्या कामगारांना तसेच सकारात्मक जनजागृती करणार्या माध्यमांना मोठा सलाम असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मुंबईने कोरोना विरुद्ध चांगली लढाई लढली असून आपल्याला कोरोनाला हरवायचे आहे हा एकच ध्यास मुंबईतील जनतेसमोर आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या असे आवाहनही त्यांनी केले आहे.
आजची ही आकडेवारी पाहता मुंबईत कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 93% इतका झाला आहे. तर कोविड रुग्ण वाढीचा दर 0.21% इतका झाला आहे.











