
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोरोना विषाणू (कोविड -१)) संसर्गातून बचाव करण्यासाठी घरांच्या बाहेर पाडण्याचे निकष आणि आरोग्यविषयक सल्ला. त्याचबरोबर दररोज दारू पिणाऱ्या लोकांसाठी कठीण झाले आहे आणि ते त्यामुळे व्याकुळ झाले आहेत. याचसाठी सामूहिक उत्थान सेवा समिति आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या माध्यमातून डि-एडिक्शन हेल्पलाइन सुरु करण्यात अली असून इथे संपर्क करणाऱ्यांची संख्या वाढली असून दारूचे सेवन करणारे तर फोन करत आहेतच पण त्यांचे कुटुंबीय पण भरपूर त्रासातून जात आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे दारू ना मिळाल्या मुळे दारुड्यांची होणारी मळमळ, उलट्या, पोटदुखी, डोकेदुखी, घाम येणे, हातपाय थरथरणे आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी.

अशा सर्व लोकांना कोकण संस्था आणि सामूहिक उत्थान सेवा समिति यांच्या माध्यमातून नशामुक्ती टेलिफोनिक कौन्सिलिंग सेंटर सुरु केले आहे. तरी ज्यांची दारू सोडण्याची इच्छा असेल आणि त्यांना नशा सोडण्याच्या उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या २४ तास डि-एडिक्शन हेल्पलाइन नंबर ०९७९५०१३८६९ वर संपर्क करावा साधावा असे आवाहन सामूहिक उत्थान सेवा समिति अध्यक्ष विजय सिंग यांनी केले आहे.










