
मुंबई: स्मृती इराणी आणि एकता कपूर दोघीही तब्बल १४ किमी पायी चालत सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या. दर्शन घेतल्यानंतर या दोघींनी सेल्फी काढला आणि एकतानं हाच सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत भाजपच्या उमेदवार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी ‘जायंट किलर’ ठरल्या. हा विजय साजरा करण्यासाठी स्मृती इराणी मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पायी चालत पोहोचल्या. स्मृती इराणी आणि त्यांची मैत्रीण निर्माती एकता कपूर हिनं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला आहे.











