
Our Fight Against Corona
मुंबई: प्रगती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत कोरोना प्रकोप सुरू झाल्यापासून निरंतर मदतकार्य सुरू आहे. लॉक डाऊनमुळे अनेक मजदुर आणि रोजंदारीवर काम करीत असलेल्यांचे अतोनात हाल होत आहेत. हीच बाब हेरून प्रगती फाऊंडेशन मार्फत गरजूंना मोफत अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास पाचशे कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य वाटप वितरित करण्यात आले होते.

संस्थेने हेच कार्य सुरू ठेवत आज कुर्ला पाच्छिम्, कालिना आणि चेंबूर विभागात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने पाच किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचे पीठ, एक किलो तुर डाळ, एक किलो खाद्य तेल, कडधान्य, पोहा, आणि साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होता.

संस्थेमार्फत अध्यक्ष किरण राणे, कार्यकारी संचालक सौ. सिद्धी राणे, सल्लागार प्रो. आर आर एस मणी, अॅड् सलीम पटेल, विश्वस्त डॉ गीतांजली महाडिक, राकेश वाणी, चिन्मय चव्हाण, मुकेश विश्वकर्मा, आणि प्रणय ढमाळ यांनी योगदान दिले.

या दुसऱ्या टप्प्यात ओम फाऊंडेशन, डॉ गीतांजली, डॉ विनय पवार, अखिल बाजपेयी यांचेही सहकार्य लाभले. प्रणय ढमाळ यांनी स्थानिक श्री दत्तगुरु सेवा मित्र मंडळ यांच्या मदतीने विविध भागात सदर मदत वितरित केली. संस्थेने हे कार्य निरंतर सुरू राहावे या करिता विविध दानशूर व्यक्ती व संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे. मदातीकरिता खालील लिंक करावे असे सांगण्यात आले आहे. संस्थेने या अगोदर सुद्धा मोफत अन्न धान्य वाटप आणि डॉक्टरांना पी पी ई किट्स चे वाटप केले होते.













