Corona update: राज्यात २६ मृत्यु,१००८ नवीन रुग्ण ; एकूण रूग्णांचा आकडा ११,५०६ वर

मुंबई – राज्यात दिवसभरात 26 कोरोनाबधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 485  बळी गेले आहेत. तर तब्बल 1008  रुग्णांचा वैद्यकीय अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11,506 वर पोहोचली आहे. तर 106  रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजपर्यंत एकूण 1879 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

आज मृत्यू झालेल्या 26 पैकी पुणे येथील सर्वाधिक 10,  मुंबईचे 5 , जळगाव जिल्ह्यातील 3,  पुणे जिल्हा,  सिंधुदुर्ग,  भिवंडी,  नांदेड,  ठाणे,  औरंगाबाद आणि परभणी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.  तसेच उत्तरप्रदेशातील एका नागरिकाचा मुंबईत मृत्यू झाला. या 26 मृतांमध्ये 18  पुरुष आणि 8 महिलांचा समावेश आहे.

या पैकी 14  रुग्ण 60 वर्षांपुढील होते. तर अन्य 11 जण 40 ते 59 वर्ष वयोगटातील, तर एकजण 40 वर्षांखालील आहे. 26  मृतांपैकी 15 जणांना 58  टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे गंभीर आजार असल्याचे आढळून आले. कोरोनामुळे राज्यात आतापर्यंत 485  बळी गेले आहेत.

आज राज्यभरात एकूण 1,53,125 नमुन्यांपैकी 1,40,587  रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आले. तर 11506 नमुने पॉझिटिव्ह आहे. सध्या राज्यात 1,36,926  नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर 9160 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर आजपर्यंत एकूण 1879 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

याशिवाय राज्यात 1,63,026 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 11,677  नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.