MHT-CETचा निकाल जाहीर

मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या पालकाचे नाव, आईचे नाव यांचा उल्लेख असेल. निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाईल, असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 
विद्यार्थ्यांनाhttps://mhtcet2019.mahaonline.gov.in/या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहता येईल.