कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनुभवा वर्चुअल गणेशोत्सव, मुंबईतील विविध लाडक्या बाप्पांचे घ्या ऑनलाईन दर्शन

मुंबईचा गणेशोत्सव फेसबुक पेज तर्फे Virtual गणेशोत्सव ची संकल्पना

२०२० हे वर्ष जागतिक रोगाच्या विळख्यात सापडले असून या covid19 मुळे आपल्या देशाचे राज्याचे आणि मुंबईचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कोणत्याही स्वरूपाचे सार्वजनिक काम करण्यावर निर्बंध येत आहेत , अशा वेळी मुंबई महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत श्री गणेशाचे आगमन २ महिन्यांवर येऊन ठेपले आहे. या उत्सवाची सुरुवात मे महिन्यापासून सुरू होते . मग त्यात मूर्तिकारांच्या कार्यशाळेत मंडळांची ये जा सुरू होते आणि जस जसे दिवस जाऊ लागतात तसतसे मोठमोठे आगमन सोहळे देखील सुरू होतात.


यंदा मात्र चित्र वेगळे आहे एकंदरीत वाढत जाणार Lockdown आणि सामाजिक आणि शारीरिक अंतर ठेवून पाळले जाणारे नियम याचा विचार करून यंदाच्या गणेशोत्सव मध्ये मोठमोठ्या मंडळात ज्या भाविकांना पोहचता येणार नाही त्यांच्यासाठी गणेशोत्सव वर आधारित फेसबुकवरील सर्वात जुने मुंबईचा गणेशोत्सव फेसबुक पेज तर्फे Virtual गणेशोत्सव ची संकल्पना समोर आणली आहे.


पेज संचालकांना याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की गणेशोत्सव काळात आपल्या लाडक्या बाप्पाची झलक पाहण्यासाठी भाविक तासंतास रांगेत उभे राहतात यावर्षी एकंदरीत परिस्थिती पाहता कोणत्याही स्वरूपाची रोगराई पसरू नये याची काळजी प्रशासनासोबत मंडळे देखील घ्यायला तयार आहेत, अशावेळी गर्दी टाळता यावी याकरता पेजवरून मोठं मोठी मंडळे फेसबुक आणि युट्युबच्या माध्यमातून 24 तास दर्शनासाठी भाविकांना उपलब्ध असतील याबद्दल लवकरच मंडळांशी संपर्क साधून पुढील नियोजन केले जाणार आहे.


अपेक्षा आहे ही संकल्पना मंडळांना आणि भाविकांना आवडेल
मुंबईचा गणेशोत्सव पेज गेली ८ वर्षे पेजच्या माध्यमातून वर्षभर लोकांना अहोरात्र छायाचित्रांच्या मार्फत श्री गणेशाचे दर्शन घडवत असते, नुकताच पेज ने ३०००००+ Likes चा टप्पा पार केला आहे , त्याच सोबत Lockdown काळात गणेशभक्तांसाठी चित्रकला, टाकाउ पासून टिकाऊ, छायाचित्रण स्पर्धांचे आयोजन केले होते. यास्पर्धांना खूप मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून त्याच सोबत पोलीस कर्मचाऱ्यांना पाणी, ज्यूस वाटप सारखे सामाजिक कार्य देखील करीत आहेत.


पेज संचालकांशी संपर्क साधला असता हा गणेशोत्सव घरी राहा सुरक्षित राहा याचा विचार करून बाप्पाला घरोघरी पोहोचवण्याची मोठी जबाबदारी आम्हाला पाडायची आहे असे सांगण्यात आले. प्रणित तेजम, तेजस दळवी, ओंकार कुलपे, नयन डुंबरे, अमित कोकाटे, निखिल मोरे, अखिल सावंत, विराज जांभळे, अनिकेत पवार, सोहम आफंडकर आद तरुण पिढी हे कार्य करीत आहेत.

https://www.facebook.com/MumbaichaGaneshotsavofficial/

Facebook :-
https://www.facebook.com/MumbaichaGaneshotsavofficial/

Instagram :-
mumbaicha_ganeshotsav