

सध्याच्या कोरोना महामारीच्या परिस्थितीत अनेक सामाजिक संस्था , वृद्धाश्रम, बलागृह इत्यादींना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण बऱ्याच कंपन्या आणि दानशूर व्यक्ती हे कोरोना विषयी मदत पुरवित आहेत आणि कोरोना संबधित प्रोजेक्टला दान करीत आहेत अशावेळी वृद्धाश्रम व बालगृह चालविणाऱ्या संस्थाना त्यांचा दररोजचा खर्च परवडत नाही. अनेक संस्था भाडे तत्वावर चालवल्या जातात तसेच विजेचे बिल, टेलिफोन बिल, स्टाफ पगार अन्नधान्य सामुग्री इत्यादी खर्चाचा ताळमेळ बसविताना अवघड होते आहे.

आणि म्हणूनच प्रगती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने मागील काही दिवसांपासून वयक्तित देणगीदार शोधून त्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस एक दिवसाचे जेवण पुरस्कृत करून साजरे करण्याचे आवाहन केले. त्यातून मिळणारा निधी जवळच्या गरजू संस्थांना देवून आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी छोटेसे पाऊल उचलले आहे. आज परत एकदा खारघर येथील गिरिजा घर बालग्रम आणि वृद्धाश्रम मध्ये एक दिवसाचे अन्नदान करण्यात आले.

अशाच प्रकारे दानशूर व्यक्ती यांनी पुढे येवून अशाच प्रकारे चांगले कार्य करीत असलेल्या संस्थांना मदत करावी व या संकट समयी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना प्रोत्साहन द्यावे. अशी विनंती प्रगती फौंडेशनचे अध्यक्ष किरण राणे यांनी केलं आहे.











