
अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक 2020 मध्ये अखेर डेमोक्रेट्स (Democratic Party) पक्षाचे उमेदवार जो बिडेन (Joe Biden Wins US Presidential Election) विजयी झाले आहेत.
परंपरेप्रमाणे आता अमेरिकेची सर्वोच्च सत्ता असलेले व्हाईट हाऊस जो बिडेन (Joe Biden defeat Donald Trump) यांच्या ताब्यात येणार आहे.
जो बाइडेन (Joe Biden) हे युनायडेड स्टेस्ट्सचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील.
रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बिडेन हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. अमेरिकेच्या इतिहासातील अपवादात्मक निवाडणुकांपैकी एक अशी ही निवडणूक ठरली. शेवटच्या क्षणापर्यंत काय होणार याबाबत अमेरिकी नागरिक आणि जग श्वास रोखून होते.
अखेर निकाल पुढे आला आहे. दरम्यान, जो बिडेन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. परंतू, अमेरिकी प्रसारमाध्यमांनी बिडेन यांच्या विजयाचे वृत्त दिले आहे. सीएनएन, एनबीसी न्यूज आणि सीबीएस न्यूज या माध्यमांनी प्रामुख्याने हे वृत्त दिले आहे.











