महाराष्ट्र सरकार दिल्ली ते मुंबई दरम्यान रेल्वे आणि हवाई वाहतूक थांबवू शकतात?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे अधिकार्‍यांशी रेल्वे सेवेबाबत चर्चा केली आहे. सध्या मध्य रेल्वेमधील एक आणि पश्चिम रेल्वेच्या पाच गाड्या मुंबई ते दिल्ली दरम्यान धावत आहेत. देशात कोरोना संसर्गाची गती पुन्हा भितीदायक बनत चालली आहे. वेगाने वाढणार्‍या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली ते मुंबई दरम्यान काही काळासाठी उड्डाणे थांबविण्यात येऊ शकतात. गाड्या थांबविण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.

शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाबाबत अधिकार्‍यांशी चर्चा केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यात रेल्वे आणि विमान सेवा बंद करण्याचा प्रस्ताव आला आहे. मुख्यमंत्री लवकरच मंत्रिमंडळाची बैठक बोलवू शकतात अशीही चर्चा आहे.