
मुंबई – येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅगन फ्लाय या जे. डब्लू. हॉटेलजवळील क्लबवर मुंबई पोलिसांनी धाड टाकली.
या छाप्यामध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींचे नाव आल्याने चर्चेचा विषय ठरत आहे. माजी क्रिकेटपटू सुरेश रैना, गायक गुरु रंधावा, रॅपर बादशाह, हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खान आदी सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी खुलासा केला आहे. ‘आज पहाटे तीनच्या सुमारास या क्बलवर छापा टाकण्यात आला आहे.
कलम 188 आणि 33 W (मुंबई पोलीस कायदा) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नाईट कर्फ्यू जाहीर केला आहे. मात्र विहित वेळेच्या पलिकडे तो क्लब सुरु होता, म्हणून कारवाई केलेली आहे.’ असं ते म्हणाले.











