
सलमानने आपल्या आगामी ‘राधेः योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाचे राइट्स महागड्या किंमतीत विकले आहेत. या चित्रपटाचे म्यूजिकचे सॅटॅलाइट, डिजिटल आणि थिएट्रिकल राइट्स (भारत आणि जागतिक) झी स्टुडिओला 230 कोटींमध्ये विकले गेले आहे.
कोरोना साथीच्या काळात चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीलाही अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशात सध्या सलमानचा चित्रपट करार बॉलीवूडमधील सर्वात महाग आणि मोठा सौदा मानला जात आहे.
चित्रपटामध्ये सलमानबरोबर दिशा पटानी आणि रणदीप हूडा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
प्रभुदेवा दिग्दर्शित हा चित्रपट ईद 2020 मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना साथीमुळे आणि लॉकडाऊनमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.











