स्वच्छतेसाठी नवी मुंबईत रिक्षा- टॕक्सी चालकांशी संवाद

नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था सलग्न शिव वाहतूकसेवा नवी मुंबई व स्वच्छ भारत मिशन २०२१ नवी मुंबई महानगर पालिका नेरूळ विभागाच्या वतीने रिक्षा टॕक्सी चालकाशी स्वच्छता राखणे याविषयी संवाद साधण्यात आला.
गोवा मावा गुटखा खाऊ नका व भर रस्त्यावर कचरा टाकून आपले रिक्षा चालकाँचे नाव खराब करू नका तसेच प्रत्येक वाहनावर स्वच्छ भारत मिशन २०२१ हे स्टिकर लावणे याबाबतीत मार्गदर्शन करण्यात आले.


या कार्यक्रमात शिरिश आरधवाढ , व्यवस्थापक परिवहन विभाग नवी मुंबई , श्नलेश नलावडे , उपायुक्त नवी मुंबई दत्तात्रय नागंरे , सह उपायुक्त नेरूळ नवी मुंबई , इगळे स्वच्छता अधिकारी , अरूण पाटील, स्वच्छता निरिक्षक तसेच दिलिप किसनराव आमले अध्यक्ष शिवसेना शिव वाहतूकसेवा नवी मुंबई तसेच युनियन पदाधिकारी सोपान जेजुरकर आनिल निकम तसेच टँक्सी विभाग सुरेश नलावडे , रवी सूर्वे तसेच रिक्षा चालक उपस्थित होते.