सौरव गांगुली पुन्हा रुग्णालयात

बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना आज सकाळी छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर कोलकाता (Kolkata) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गांगुलीला यापुरवो हृदय संबंधित आजारामुळे यंदा महिन्याच्या सुरुवातीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि वैद्यकीय प्रक्रियेद्वारे उपचार घेण्यात आले होते. 

अलीकडेच, 48 वर्षीय माजी क्रिकेटपटू आणि माजी भारतीय कर्णधारावर छातीत दुखल्यानंतर कोलकाताच्या वुडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्याच्या हृदयाच्या तीन रक्तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासाठी एक स्टेंट लावण्यात आला. बेंगलोर येथील नामांकित डॉक्टर डॉ. शेट्टी यांनी कोलकाता येथे येऊन गांगुलीवर उपचार केले होते ज्यानंतर काही दिवसांनी त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.