शेती खतांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय: खतांवरील अनुदानात वाढ, शेतकऱ्यंना जुन्याच दराने मिळणार खतं

केंद्र सरकार (Central Government) ने शेतकऱ्यांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डीएपी म्हणजेच आमोनियम फॉस्फेट (DAP) खतांवर मिळणारे अनुदान 14% नी वाढवले आहे.

शेतकऱ्यांना डीएपी आता 1200 रुपये गोणी या दराने DAP Fertilizer Rate मिळणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत डीएपीवर 500 रुपये प्रति गोणीवरुन वाढ करत अनुदान 1200 रुपये प्रति गोणी करण्यात आले.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर म्हटले की, सराकार शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी कठीबद्ध आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दरांमध्ये वाढ होऊनही आम्ही त्यांना जुन्या दरांनीच खत पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या निर्णयानंतर डीएपी खत प्रति गोण 2400 रुपयांऐवजी 1200 रुपये दराने मिळेल.