Cryptocurrency: देशात क्रिप्टोकरन्सच्या प्रती अधिक उत्सुकता , भारत उच्च स्थानी; अमेरिका, रशिया आणि चीनसारख्या देशांना टाकले मागे

क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) बद्दल आरबीआय (RBI) काय घोषणा करणार किंवा काय विचार करतात याबद्दल भारतीय लोकांवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होताना दिसून येत नाही आहे. देशात क्रिप्टोकरन्सच्या प्रती अधिक उत्सुकता वाढत असल्याचे दिसून येत आहे. BrokerChooser च्या एका रिपोर्ट्सनुसार आपल्या देशात 10 कोटीहून अधिक लोकांकडे क्रिप्टोकरन्सी आहे. हा आकडा जगभरात सर्वाधिक आहे. या प्रकरणी अमेरिका, चीन, इंग्लंड आणि युरोपातील अन्य देशांना पाठी टाकले आहे.

लिस्टमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर अमेरिका आणि रशियाचा क्रमांक येतो. तर भारतात 7.3 टक्के जनसंख्येकडे क्रिप्टो होल्डिंग्स आहे. यामध्ये भारताचा पाचवा क्रमांक लागतो. जनसंख्येच्या टक्केवारीनुसार युक्रेन पहिल्या क्रमांकावर आहे. तेथील 12.73 टक्के जनसंख्येकडे क्रिप्टो होल्डिंग्स आहेत. त्यानंतर रशियाचा क्रमांक येतो. तेथे 11.91 टक्के, केनिया मध्ये 8.52 टक्के आणि अमेरिकेत 8.31 टक्के जनसंख्येकडे क्रिप्टो होल्डिंग्स आहेत.

इंटरनेटवर क्रिप्टोकरन्सी सर्च प्रकरणी भारताचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या 12 महिन्यात भारतात एकूण 36 लाख वेळा याबद्दल सर्च करण्यात आले. अमेरिका या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. येथे गेल्या 12 महिन्यात एकूण 69 वेळा सर्च केले गेले.