
मित्रहो सध्या संपूर्ण पृथ्वीवर कोरोना नावाच्या विषाणूने हैदोस घातला आहे. प्रत्येक देश आप आपल्या परीने कोरोना विरुद्ध लढा देत आहे. चीनपासून सुरूवात झालेला कोरोना हल्ला जवळपास दीडशेहून अधिक देशात पसरला आहे. आपल्या भारतात देखील याचा शिरकाव झाला असून नागरिक दहशतीखाली आहेत. सरकारी यंत्रणा कामाला लागली असून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे.
Coronavirus विषयी अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती कण्यासाठी प्रयत्न केले आहेत आणि करीत आहेत. याविषयी जाणून घेताना नागरिकांनी हे लक्षात घ्यायला हवे की कोरोना विषाणू संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे.
कोरोना विषाणू प्रसार होण्याचे महत्त्वाचे टप्पे खालील प्रमाणे आहेत.
- परदेशातून येणाऱ्या व्यक्तीबरोबर आयात
- आयात झालेल्या विषाणूचा देशातील लोकांत प्रवेश
- स्थानिक लोकांच्या माध्यमातून विविध समूहात प्रवेश
आतापर्यंत जर का तुम्ही जगभरातील कोरोनाबधित देशांवर नजर टाकली तर तुमच्या लक्षात येईल की विषाणू संक्रमणाच्या किंवा प्रसाराच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रभाव विनाशकारी ठरत आहे. चीन, ईरान, स्पेन, फ्रान्स आणि अमेरिका सारखे देशही याटप्प्यात हतबल झालेले पाहायला मिळत आहेत. भारताचा विचार केल्यास आपण अगदी लवकर म्हणजे साधारण जानेवारीपासून परदेशातून येणाऱ्या व्यक्तींची स्क्रिनिंग (तपासणी) चालू केली होती त्यामुळे पहिला आणि दुसरा टप्पा आपण व्यवस्थित पार पाडला. आता खरी कसोटी आहे ती तिसऱ्या टप्प्यात आपण कोरोणावार कितीप्रमाणात नियंत्रण मिळवू शकतो. यात सरकारी यंत्रणा आणि जनसामान्य यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
सरकारने सार्वजनिक कार्यक्रम तसेच गर्दीचे ईतर अनेक कार्यक्रमावर बंदी घातली आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल, पर्यटन स्थळे, थिएटर आदी गर्दीचे ठिकाणं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता नागरिकांनी या सर्व प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देणं आवश्यक आहे. तसेच कोरोनो विषाणू पासून बाधा होवू नये म्हणून काळजी घेणे आवश्यक आहे. विविध संस्था, आरोग्य विभाग, सरकारी यंत्रणा यांनी कोरोनापासून बाधा होवू नये म्हणून सूचना प्रसारित केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.
कोरोनाचे लक्षण कसे ओळखावे?
- जर तुम्हाला खूप दिवसापासून खोकला आहे.
- सतत सर्दी व शिंका येतात
- घसा खवखवणे, दुखणे इत्यादी
- अधूनमधून ताप येणे
- डोके वारंवार दुखणे
- अंग दुखून येणे
- अशक्तपणा जाणवत श्वास घेण्यास त्रास होणे
- दम लागणे, थकवा येणे
ही सर्व लक्षणे साधारण सात ते दहा दिवसांत घडतात तेव्हा यातील काही लक्षणे साधारण सर्दी खोकला ताप याबाबत असली तरी ताबडतोब दवाखान्यात जाऊन डॉक्टर उपचार आवश्यक आहे. तज्ञ डॉक्टर शंका आल्यास कोरोना विषयी चाचणी करण्याची सूचना करतात. Coronavirus बाबत तपासणी आणि टेस्ट सरकार मान्य लॅब आणि ठराविक इस्पितळात होते.
कोरोना पासून बचाव करण्यासाठी कोणती काळजी घ्याल?
- परदेशी प्रवास टाळावा (Avoid foreign travel)
- स्थानिक प्रवासही शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे (Avoid Crowded Places)
- हस्तांदोलन आणि गळाभेट टाळावे (No Shakehand)
- तुम्हाला खोकला आणि सर्दी असल्यास मास्क किंवा रुमाल वापरावा (Use mask or handerchief)
- जेवताना किंवा खाताना हॅण्ड वॉश, साबण किंवा सनिटायझर वापरावा (Maintain personal hygiene)
- हात व चेहरा वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे.(clean your face and hand with soap)
- ताजे अन्न पदार्थ खावे, थंड आणि फ्रिज मधील पदार्थ खाऊ नये. (Eat fresh home made food, do not eat cold and stored food)
- ऑनलाईन पोर्टलवर शॉपिंग केली असेल आणि तुम्ही घरी पार्सल घेणार असाल तर पार्सल घेतल्यानंतर सनिटयाझार ने हात स्वच्छ करून घ्या.
- वातानुकूलित रेल्वेने प्रवास करीत असाल तर स्वतःचा ब्लँकेट किंवा चादर घेवून प्रवास करा.
- तुम्ही जर का बाहेर सलून मध्ये दाढी करीत असाल तर स्वतःचा टॉवेल घेवून जा व तोच वापरायला सांगा.
- मास्क दररोज घेणे आणि वापरणे शक्य नसल्यास हात रुमाल दररोज डेटॉल मध्ये स्वच्छ धुवून मास्क प्रमाणे वापरा.
- काही दिवस बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळा.
अर्ध कच्च मांस आणि मासे खाणे टाळा. पूर्णपणे शिजवलेले अन्न पदार्थ खा. - शीळ आणि फ्रिज मधील अन्न पदार्थ खाऊ नये.
शीतपेय आणि थंड पदार्थ जसे आईस्क्रीम इत्यादी टाळा. - एक दुसऱ्याचे कपडे किंवा वस्तू वापरणे टाळा.
- जेथे वस्तूला स्पर्श करण्याची गरज असेल तेथे हॅण्ड ग्लोज वापरा.
- बाहेर गावाहून प्रवास करून येणाऱ्या व्यक्तीबरोबर थेट संपर्क टाळावा. त्या व्यक्तीची quarantine process झाल्या शिवाय संपर्कात येवू नये.
- साधा सर्दी, खोकला, ताप जरी आला तरी त्वरित जवळच्या डॉक्टरकडे संपर्क साधून उपचार सुरू करा.
- शिंकाताना किंवा खोकताना तोंडावर रुमाल धरावा.
- तुम्ही जर का बाहेरगावाहून प्रवास करून आला असाल तर स्वतः सरकारी आयसोलेशन सेंटर मध्ये जावून तपासणी करून घ्यावी.
- तुम्ही जर का कोरोना बाधित देशातून आला असाल तर स्वतः सरकारी मदत कार्य कक्षाला संपर्क साधावा. कोणतीही माहिती लपवू नका.










