महिलेला अश्लील मैसेज पाठवून विनयभंग,एकावर गुन्हा दाखल

चिंचवड, पुणे – महिलेला अश्लील मेसेज आणि फोटो पाठवून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.

सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादी महिलेच्या व्हाट्सअपवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले. त्यामुळे फिर्यादी महिलेने ते फोटो आणि मेसेज डिलीट करून आरोपीचा नंबर ब्लॉक केला.

सोमवारी (दि.८) सकाळी सहा वाजता दुस-या नंबरवरून आरोपीने अश्लील फोटो आणि मेसेज पाठवल्याचे निदर्शनास आले.

फिर्यादी महिलेने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला असता आरोपी हा फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र असल्याचे समजले. आरोपीने यापूर्वी फिर्यादीच्या भाचीला देखील अशाच प्रकारचे अश्लील मेसेज पाठवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.