
अंबरनाथ-बहिणीची छेड काढल्याच्या संशयावरून अंबरनाथमध्ये तीन लहान मुलांना विवस्त्र करून मारहाण करतानाचा व्हिडियो व्हायरल झाला आहे.
आपल्या बहिणीला छेडल्याच्या संशयावरून एका तरूणाने तीन लहान मुलांना विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची घटना अंबरनाथ पश्चिम परिसरात घडली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे मुलांना अमानुषपणे मारहाण करतानाचा व्हिडीओ या तरुणाने सोशल मीडियावर वायरल केला होता .
अंबरनाथ पोलिसांनी या तरुणाचा शोध घेत त्याला अटक केली आहे











