
राज्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती सध्या उद्भवली आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी 4.30 वाजता महत्वाची बैठक बोलावली आहे.
या बैठकीला वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, देशातीलही एकूणच कोरोची स्थिती गंभीर होत असल्याने आज दिल्लीतही महत्वाची बैठक होणार आहे.
तसेच, पुण्यातही आज पुण्याचे पालकमंत्री अजित पवार बैठक घेणार आहेत. पुण्यात लॉकाडऊन लागणार की निर्बंध क़डक होणार यासाठी आजची बैठक आहे. त्यामुळे एकूणच कोोरनाची स्थिती पाहता आजच्या सगळ्या बैठका महत्वाच्या आहेत.
पुणेकरांनी नियमांची कडक अंमलबजावणी करा व रुग्ण संख्या कमी नाही झाली तर २ एप्रिल पासून लॉकडाऊन जाहीर करेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यात घेतलेल्या बैठकीत दिला होता. या पार्श्वभूमीवर आज रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात पवार यांच्या अध्यक्षतेखालील होणा-या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीमुळे प्रशासकीय हालाचलींना वेग आला आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी उपस्थितीत राहणार आहे.
या बैठकीत पुण्यात लॉकडाऊन करायचा की निर्बंध अधिक कडक करायचे याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.










