
नवी मुंबईतील जुईनगर मधील जलकुंभात सापडलेल्या मृतदेह घटनेबाबत “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” जुईनगर विभाग आक्रमक झाली असून या घटनेचा सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहे.
आज सदर घटनास्थळी जुईनगरचे मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसल, प्रभाग क्र:- ८३ चे मनसे शाखा अध्यक्ष मयुर कारंडे आणि मनसे उपशाखा अध्यक्ष सुशांत घोरपडे ह्यांनी भेट दिली असता, त्यांच्या निदर्शनास आले की ज्या ठिकाणाहून १५ ते २० हजार लोकांना पाणी पुरवठा होतो अशा ठिकाणी खूपच निष्काळजीपणा आहे. तिथे सुरक्षारक्षक नाही, Cctv मागील बाजूस नाही, टाकीचे झाकण कोणीही सहज उघडेल अशा अवस्थेत आहे, व्यवस्थित भिंतीला कंपाऊंड नाही. एवढा हलगर्जीपणा महालपालिकेचा दिसून येतोय म्हणूनच या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना मार्फत आवाज उठविण्यात येत आहे.
वरील सर्व त्रुटींची सुधारणा करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली आहे आणि संबंधित अधिकारी वर कडक कारवाई झालीच पाहिजे ही देखील मागणी करण्यात आली आहे.
संबंधित केस ज्या वरिष्ठ पो. निरीक्षकांच्या अंतर्गत आहे, त्यांची ही आज भेट घेतली, त्यांच्या म्हणण्यानुसार मृतदेह कमीतकमी १५-२० दिवस टाकीत होता. या घटनेबाबत PM रिपोर्ट आल्यानंतर अधिक माहिती मिळेल पोलिसांचा तपास चालू आहे अशी माहिती दिली. तसेच गेली २ दिवस जुईनगर मधील सर्व व्हाट्स ग्रुप वर एक मृतदेहाचा फोटो वायरल होतोय, पोलीस माहितीनुसार त्या फोटोचा ह्या घटनेशी काही ही सबंध नाही, तरी कोणी ही अशी अफवा पसरू नये असेही पो. निरीक्षकांनी सांगितले.
साधारण १५-२० हजार लोकांना ज्या ठिकाणाहून पाणी पुरवले जाते अशा ठिकाणी एवढा निष्काळजीपणा कसा काय असू शकतो? एवढे दुर्लक्ष जर होत असेल तर संबंधित अभियंता जबाबदारीस सक्षम नाही म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मनसे शाखा अध्यक्ष मयुर कारंडे आणि विभाग अध्यक्ष अक्षय भोसले ह्यांनी केली आहे.












