
नवी दिल्ली: मागील 12 महिन्यामध्ये सलगची कार विक्रीत घसरण होत गेल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्याच्या काहीशा प्रभावामुळेच सध्या देशातील कार एजन्सीच असणारे शोरुम बंद होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे कंपन्या मोठय़ा प्रमाणात नोकऱयांमध्ये कपात करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
मागील एक वर्षापासून प्रवासी वाहनांच्या जवळपास 200 एजन्सी शोरुम बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यात काम करणाऱया जवळपास 25 हजार रोजगार बंदमुळे त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ येणार असल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन (एफएडीए) यांच्या माहितीमध्ये स्पष्ट केले आहे. वाहन विक्रीतील घट आणि थकीत कर्जाची परतफेड वेळेत होत नसल्याच्या कारणास्तव बँका व एनबीएफसीने निधी देण्याचे बंद केले आहे.










