
ठाणे – राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली.ठाणे जिल्ह्यातील सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्यावतीने ठाणे,उल्हासनगर,मिरा भाईंदर,कल्याण डोंबिवली या महानगरपालिकांना प्रत्येकी ०५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आणखी मशिन्स उपलब्ध करून देण्यात येईल, असे ही यावेळी त्यांनी सांगितले.
या बैठकीस नगरविकास मंत्री, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे,खासदार राजन विचारे,आमदार रविंद्र फाटक, ठाणे महापौर नरेश म्हस्के,खासदार श्रीकांत शिंदे,ठाणे मनपा आयुक्त विपीन शर्मा, मीरा भाईंदर मनपाचे आयुक्त डॉ.विजय राठोड, उल्हासनगर मनपा आयुक्त डॉ राजा दयानिधी उपस्थित होते.











