भाजपच्या आसूड मोर्च्याने दणाणले बुलडाणा शहर…

माजी मंत्री आ. डॉ.संजय कुटे, आ.श्वेताताई महाले,मा.आमदार विजयराज शिंदे,जिल्हा सरचिटणीस योगेंद्र गोडे यांच्या कडून महाविकास आघाडी सरकारचे पोस्ट मार्टम

बुलडाणा :- बुलडाणा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट 50 हजाराची मदत खात्यात जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा या व इतर मागण्यांसाठी आज भाजपा बुलडाणा विधानसभा मतदार संघाच्या वतीने भव्य आसूड मोर्च्या माजी मंत्री आ.डॉ संजयजी कुटे,जिल्हाध्यक्ष आ.आकाशदादा फुंडकर, आ.श्वेताताई महाले यांच्या मार्गदर्शनात तसेच मा.आमदार विजयराज शिंदे व जिल्हा सरचिटणीस योगेंद्रजी गोडे यांच्या प्रमुख नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत काढण्यात आला.

जिजामाता स्टेडियम, शिवालया पासून निघालेल्या आसूड मोर्च्यांत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्च्यांत भाजपाच्या झेंड्यानी सजलेल्या बैलगाड्या, ट्रॅक्टर, आसूड धारी पोतराज, सडलेले सोयाबीन सुड्या व खराब कापसाची बोंडे, किसान मोर्च्यांचे तालुकाध्यक्ष सुभाष,भाजपा सरचिटणीस अर्जुन दांडगे व काही सहकारी यांनी प्रतिरुपी महाविकास आघाडी सरकारवर आसूड उजागवणारा देखावा या सर्वांनी मोर्च्याची विशेष शोभा वाढविली होती. ढोलताशा व महाविकास आघाडी सरकारच्या घोषणांनी संपूर्ण बुलडाणा शहर दणाणून गेले होते. स्टेडियम-संगमचौक- जयस्तंभ चौक-बाजार लाईन-जनता चौक-कारंजा चौक-भोंडे चौक-ऑटो स्टॉप या मार्गाने मार्गक्रमण करत आसूड मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी ट्रॅक्टर वर चढून भाजपा नेत्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे पूर्ण पोस्ट मार्टम करून सरकारवर कडाडून टीका केली.

माजी मंत्री आ.संजयजी कुटे यांनी राज्य सरकारचा , सरकार मधील मंत्र्यांचा भांडाफोड करून जो पर्यंत शेतकऱ्यांना योग्य मदत मिळणार नाही तो पर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली.
आमदार श्वेताताई महाले यांनी राज्यसकारचा दुटप्पी पणा जनतेसमोर मांडला “उत्तरप्रदेश च्या प्रश्नावर महाराष्ट्र बंद ठेवणारे राज्यातील सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प का?असा प्रश्न उपस्थित करून “सरकारने आमच्या वर कितीही गुन्हे दाखल केले तरी शेतकऱ्यांसाठी मागे हटणार नाही” असे मत व्यक्त केले.
मा.आमदार विजयराज शिंदे यांनी “शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे न करता आता सरसकट 50 हजाराची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा व शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा,अन्यथा सरकार मधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही” असा खोचक इशारा यावेळी सरकारला आपल्या भाषणातून दिला. जिल्हा सरचिटणीस योगेंद्रजी गोडे यांनीही राज्यसरकारवर टीका करून शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली. जमलेल्या जनसमुदयाने लोकशाही मार्गाने भाजपच्या मागण्या आपल्या घोषणांनी देखाव्यांनी व्यक्त केल्या. भाजपा पदाधिकारी यांनीही आसूड उजगारन राज्य सरकारचा विरोध व असंतोष व्यक्त केला.

आसूड मोर्च्यात मा.विश्वनाथजी माळी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देवीदास जाधव,पुरुषोत्तम लाखोटीया,सौ.विजयाताई राठी,मा.नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले,भाजपा जेष्ठ नेते प्रा.जगदेवराव बाहेकर, कडूबा पवार ,शहराध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, भाजयुमो जिल्हा संपर्क प्रमुख सोनू बाहेकर, किसान मोर्चा प्रदेश
सचिव दिपकजी वारे, विधानसभा संयोजक मंदार बाहेकर,मोताळा तालुकाध्यक्ष यशवंत पाटील, नगरसेवक अरविंद होंडे, गोविंद सराफ,वैभव इंगळे,भाजपा जि प सदस्य निरंजन वाढे,मनोहर नारखेडे,विधी आघाडी जिल्हाध्यक्ष ऍड मोहन पवार,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधुताई खेडेकर, बुलडाणा तालुकाध्यक्ष युवा मोर्चा योगेश राजपूत, जिल्हा सह सचिव अर्जुन लांडे पाटील, महिला तालुकाध्यक्ष मायाताई पदमने, देवेंद्र पायघन, राजू अपार, युवा मोर्चा तालूका सरचिटणीस गोपाल तायडे पाटील, नामदेव काळे पाटील, शरद देशमुख, ज्ञानेश्वर पाटील गुळवे, दिगा राजगुरे, रामेसग नरवाडे, सुनील पवार, युवा मोर्चा तालूका उपाध्यक्ष पंजाब हटकर, पंडित नरोटे, अनंता मांडोकार, संजय झुंबड पाटील, अनंता डुकरे पाटील, राजू अपार, पुनमताई जैस्वाल,महिला शहराध्यक्ष सौ.वर्षाताई पाथरकर,सौ उषाताई पवार,सौ शोभाताई ढवळे,ज्योती अवसरमोल, जिल्हा सचिव आनंद झोटे, बाबा वरणगावकर,महादेव शिराळ,भाजयुमो जिल्हा सरचिटणीस उमेश वाघ,मनीष पाटील,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष विनायक भाग्यवंत, शहर सरचिटणीस अनंता शिंदे,डॉ आनंदा रिंढे,संजय जुंबड,आनंदा डुकरे,दीनानाथ राजगुरे,आशिष व्यवहारे, भाजयुमो शहराध्यक्ष सोहम झालटे,राजू सुरपाटने, सचिन शेळके,डॉ वैभव इंगळे, भारत गव्हाणे,विनोद आडवे,विजय चोपडे,संजय पठाडे,दीपक मिरगे,अमोल परमार,संदीप वानेरे,सतीश भाकरे पाटील,सोपान जगताप, ईश्वरसिंग चंदेल, बाळू ठाकरे,ऍड दशरथसिंग राजपूत,खालिद राजा,रशीद शेख,मो.अकिल यासिन खान,मोहम्मद सोफियान , अतिक शेख,गजानन घोंगडे,गजानन कुऱ्हाळे, अशोक किन्होळकर,विश्वास वाघ,सागर महाले,रामेश्वर पाटील, गणेश वैराळकर, संजय आढाव,अशोक पाटील, नितीन हिवाळे, श्री.शिंगोटे, यश तायडे, किरण नाईक, राजू अपार, हरिभाऊ सिनकर, सुभाष कदम,वंदन चव्हाण, अभिषेक वायकोस,स्वप्नील ठोंबरे,प्रवीण मोतळकर, सागर कडू पाटील, मोहित भंडारी,नीरज चंदन,मंगेश वाघमारे,भगवान पाटील, गजानन देशमुख,राजेंद्र पवार,प्रकाश राजगुरे, प्रदीप तोटे, विशाल विसपुते,गणेश देवकर,अमोल देवकर,राजेश पाठक, पंकज राजपूत, समाधान निकाळजे,रवी संगेले, नितीन बेंडवाल, शनिराज सौदे,नारायण देशमुख,कैलास पाटील, सुभाष राजपूत, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विश्रामजी पवार ,संतोश सोनुने,शांताराम वाढे,नारायण तोंडीलायता यांसह भाजपा आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव असंख्य संख्येने उपस्थित होते.